राजूर | Rajur: सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पायपीट करत अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिरातील ७५ मुलामुलींना मिळाला लायन्स क्लब पुणे फुच्यर आणि तळेगाव लायन्स क्लबच्या सायकलींचा आधार मिळाला.
शुक्रवारी खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिरातील ७५ मुलामुलींना लायन्स क्लब ऑफ पुणे फुच्यर आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या पदाधिकारी आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत ७५ सायकलींचे वाटप करण्यात आले. लायन अशोक मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे, रोहिणी नागवणकर, सुनील ओक, मेघा अंबवले, दिलीप अंबवले, प्रमिला वाळुंज, सुनील वाळुंज, नंदकुमार काळोखे, प्रकाश पटेल, डॉ सचिन पवार, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक नंदकिशोर बेल्हेकर, रामजी काठे, विजय पवार, राम पन्हाळे, व्यवस्थापक प्रकाश महाले, दिनेश शहा, ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.