Ahmednagar News: आज विद्यालयात हिंदुस्तान फिड्स कंपनीच्या सहकार्याने विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती वाळुंज के. एस.( आरोटे) मॅडम व त्यांचे पती श्री. ईश्वर आरोटे ( अगस्ती मेडिकल व श्रीकृष्ण अॅग्रो एजन्सी, अकोले) या दोघांच्या सहकार्याने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खिरविरे येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हिंदुस्तान फिड्स कंपनीचा शेतकऱ्यांशी असलेला ऋणानुबंध शेतकऱ्यांच्या मुलांनाही शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बीजमाता पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून फूडमदर ममताबाई भांगरे, हिंदुस्तान फिड्स कंपनीचे एरिया मॅनेजर श्री. अविनाश जाधव साहेब, विक्री प्रतिनिधी श्री. सचिन आदिक, विक्री प्रतिनिधी श्री. नरसिंह कुलाडे, श्रीकृष्ण अॅग्रो एजन्सीचे प्रमुख श्री. ईश्वर आरोटे हे मान्यवर उपस्थित होते. वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वोदय विद्यालयातील 380 विद्यार्थ्यांना , जिल्हा परिषद प्राथमिक , खिरविरे येथील 90 विद्यार्थ्यांना एकूण १७६८ वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर श्री. ईश्वर आरोटे व सौ. कविता वाळुंज (आरोटे) मॅडम या दोघांनी विद्यालयातील अतिशय गरीब असणाऱ्या १२ विद्यार्थी – विद्यार्थिनींना शालेय गणवेष भेट म्हणून दिले.
समाजाशी आपली नाळ जोडलेली आहे याचे हे अत्यंत चांगले कार्य या उभयतांनी केले, त्यांचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले. सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माती,शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण अशा समाजातील विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले. बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने राहीबाई पोपेरे यांचा, तसेच फूडमदर ममताबाई भांगरे यांचा सत्कार करण्यात आला. हिंदुस्तान फिड्स कंपनीच्या वतीने एरिया मॅनेजर मा.श्री अविनाश जाधव साहेब यांनी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल राहीबाई पोपेरे यांचा , तसेच पूडमदर ममताबाई भांगरे यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि फूडमदर ममताबाई भांगरे यांना विविध प्रश्न विचारले. दोन्हीही मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अतिशय चांगल्या प्रकारे उत्तरे दिली. या प्रसंगी शालेय समिती सदस्य श्री. दिनेशशेठ शहा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दत्तू हाळकुंडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. त्रिंबकशेठ पराड, प्रविण पराड, बंडू पराड, प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. राजू काळे सर, श्री. वामन डगळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य श्री. पर्बत एल. पी. यांनी, पाहुण्यांचा परिचय श्रीमती वाळुंज मॅडम यांनी, अध्यक्षिय सूचना श्री. धुमाळ एस. आर. यांनी, अनुमोदन श्री. भदाने बी.के. यांनी, आभार श्री. सचिन लगड सर यांनी , कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. पाचपुते डी. एम. यांनी केले. श्री. विक्रम आंबरे सर यांनी उत्कृष्ट छायाचित्र काढली. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.