सत्यनिकेतन परीवाराचा गुणवंत शिक्षक व विदयार्थी गौरव पुरस्कार संपन्न.

जीवनातील प्रत्येक क्षण अमुल्य आहे. त्यासाठी निवडलेला रस्ता इमानदारीचा असावा. त्यासाठी दिशा महत्वाची आहे. दिशा निवडली तर मार्ग सापडतो. मार्ग सापडला तर दिशा सापडेल नाही तर जिवनाची दशा होईल. असे गौरोद्गार सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे व सावित्रीबाई फुले विदयापिठ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच शंभर टक्के निकाल लागलेल्या विषय शिक्षकांचा गौरव पुरस्कार सोहळा सत्यनिकेतन परीवारात अॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालय राजूर(ता. अकोले ) येथे संपन्न झाला.

या प्रसंगि अॅड. मनोहरराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, चारटंट आकाऊंडन जितेन दनानी, मुंबई लायन्स क्लबचे सदस्य धिरेंद्र शहा, माजी प्राचार्य तथा संचालक प्रकाश टाकळकर, ए.बी. पवार, एम.के.बारेकर, अशोक मंडलीक, प्रकाश महाले, नंदकिशोर बेल्हेकर, डॉ.मनोज मोरे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमुख, मनोहर लेंडे, अंतुराम सावंत, के.एल. नवले, एस.के. शिंदे यांसह गुणवंत विदयार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अॅड. मनोहरराव देशमुख यांनी कृती करतो तो सल्ले देत नाही. त्यामुळे विदयार्थी हित हेच सर्वांचे हित असल्याने कृती महत्वाची आहे. आयुष्याच्या वळणावर खाचखळगे येणारच. ज्याने पोहायचा सराव गादीवर केला तो पाण्यात गेल्यावर बुडणारच. मुलांचा कल ओळखा. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रगती करा. ग्रामीण भागाचे कल्याण महत्वाचे असुन विकासाचे व्रत हाती घेतले आहे. यासाठी सत्कार हा प्रेरणा देणारा असून नौकरी मिळण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करुन हा ज्ञानाचा रथ पुढे नेण्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी धिरेंद्र शहा, गुणवंत शिक्षकांच्या वतीने डी.बी. पगारे, पालक प्रतिनिधी डॉ.मनोज मोरे, विदयार्थी प्रतिनिधी म्हणून सुयश मोरे, रेश्मा बंगाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्यनिकेतन संस्थेच्या अॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालय,सर्वोदय विद्यामंदिर राजूर, खिरविरे, कातळापुर, आश्रमशाळा शेणित या विदयालयातील प्रथम तिन क्रमांक मिळविलेले विदयार्थी, तसेच 100 टक्के निकाल लागलेल्या विषय शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश महाले, अशोक मंडलिक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

सचिव टि. एन. कानवडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पी.टी. करंडे व प्रा.एस.आर. बारवकर यांनी केले. तर सहसचिव मिलिंद उमराणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. व्हि.एन. गिते, डॉ.डी. के. गंधारे यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


  • Published: 3 years ago on August 8, 2019
  • By:
  • Last Modified: August 22, 2019 @ 5:30 pm
  • Filed Under: NEWS

NEWS