गु.रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालय राजूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

svmrajur independence day.

राजूर: अकोले तालुक्यातील गु.रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालय राजूर येथे भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष मा. एम.एन. देशमुख साहेब होते. त्यांच्या  हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मा.प्रा. टी. एन.कानवडे साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी, मा. प्राचार्य. एम.डी. लेंडे , उप प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. व  राजूर ग्रामस्थ  उपस्थित होते.
यावेळी सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष मा. एम.एन. देशमुख साहेब आणि संस्थेचे सचिव मा.प्रा. टी. एन.कानवडे साहेब यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी सर्व पालक,शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक  सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यालयाने  व पालकांनी विद्यार्थ्यांना भरपूर खाऊ दिला. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
संपादन – श्री. गुंजाळ अजित

  • Published: 4 years ago on August 15, 2018
  • By:
  • Last Modified: August 15, 2018 @ 10:15 pm
  • Filed Under: NEWS, SVM RAJUR

NEWS