राजूर: सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमा साजरी

svm guruponrnima Celebration.

राजूर: राजूर येथील सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात दि.27 जुलै शुक्रवारी विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला व तसेच त्यांच्याकडून विद्यालयास भेट वस्तू देण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव  मा. प्रा. टी. एन. कानवडे यांनी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता हीच आमच्यासाठी भेट वस्तू असेल असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधले.
यावेळी 12 वी सायन्सच्या साबळे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.  या कार्यक्रमात मा. प्राचार्य एम.डी. लेंडे यांनी गुरुपोर्णिमेचे महत्व विषद केले.  या कार्यक्रम प्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे सचिव मा. प्रा. टी. एन. कानवडे , सह सचिव मिलिंद उमराणी, मा. प्राचार्य एम.डी. लेंडे , उप प्राचार्य पर्बत एल.पी. तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
संपादन प्रतिंनिधी-  गुंजाळ अजित 

NEWS