सर्वोदय खिरविरेत मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन.
व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जीवंत राहते. म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. असे प्रतिपादन सहयोग सेवा मुंबई संस्थेच्या मॅनेजर दिपाली देवळे यांनी केले.
सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे(ता.अकोले) येथे सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातुन मिनी सायन्स सेंटर साकारण्यात आले. या सायन्स सेंटरचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी दिपाली देवळे प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावरून बोलत होत्या.
